Google Map : तीन वर्षांपूर्वी निधन पावलेले वडील दिसले गूगल मॅपवर! महिला फोटो पाहून हैराण

Google Map : तीन वर्षांपूर्वी निधन पावलेले वडील दिसले गूगल मॅपवर! महिला फोटो पाहून हैराण

Google Map : तीन वर्षांपूर्वी निधन पावलेले वडील दिसले गूगल मॅपवर! महिला फोटो पाहून हैराण

आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावणे हे खूप दुर्दैवी असते, खासकरून ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ते म्हणजे आपले आई-वडील. कारण ते आपल्याला लहानचे मोठे करतात, आपल्यावर संस्कार करतात. आई-वडील आपल्यात असेपर्यंत आपण खूप सुंदर जीवन जगत असतो. पण ते गेल्यानंतर आयुष्यभरासाठी त्यांच्या आठवणी सोडून जातात. ते गेल्यानंतर आपल्या खांद्यावर एक वेगळी जबाबदारी येते. अशात त्यांच्याबाबत किंवा त्यांच्या आयुष्याबाबत काही माहित झाले तर आपल्याला खूप आनंद होतो आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाढते. काही महिन्यापूर्वी एका महिलेसोबत असेच काहीसे घडले. तीन वर्षांपूर्वी निधन झालेले वडील महिलेला अचानक गूगल मॅपवर दिसले. यामुळे महिला हैराणच झाली.

इंग्लंडच्या कॉर्नवॉलमध्ये राहणारी ट्वीटर युजर कारेनने यावर्षी जूनमध्ये एक ट्वीट केले, ज्याला लोकांची खूप पसंती मिळाली होती. महिलेने सांगितले की, ती गूगल मॅपवर स्ट्रीट व्यू फीचरच्या माध्यमातून स्वतःचे घर शोधत होते, तेव्हा तिला अचानक वडिलांचा फोटो दिसला. ३ वर्षांपूर्वीच तिचा वडिलांचे निधन झाले होते. तसेच हा फोटो देखील मूत्यू होण्यापूर्वीचा होता. गूगलची ही सेवा प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक महिला अपडेट होत नसते. बऱ्याच काळानंतर ते अपडेट होत असते. अशातच कारेनला वडिलांचा फोटो दिसला, जे गार्डेनिंग करत होते. महिलेने सांगितले की, गार्डेनिंग करणे तिच्या वडिलांना खूप आवडायचे. जेव्हा वडिलांच्या गार्डेनिंग करतानाच्या फोटोवर लक्ष्य गेले तर ती हैराण झाली.

कारनेच्या या ट्वीटला ५१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर ३ हजारांहून अधिक जणांनी रिट्वीट केले आहे.


हेही वाचा – Viral Video: बॅटरी सेल आणि काट्या चमच्याने केली कमाल! हवेत गरागरा फिरला रुपया


 

First Published on: December 13, 2021 2:40 PM
Exit mobile version