‘या’ आहेत जगातील महागड्या vaccines!

‘या’ आहेत जगातील महागड्या vaccines!

संपूर्ण जग कोरोनाच्या प्रादुर्भावाने हैराण आहे. या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोनाची लस कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान जगभरासह देशात कोरोना लसीला मंजूरी मिळण्याच्या तयारीत आहेत तर काही देशात कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर तेथे लसीकरणाला सुरूवात देखील करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या देशातील कोरोना लसींची किंमत देखील वेगवेगळी आहे. कोरोना व्हायरस प्रमाणेच वेग-वेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी काही लसी विकसित केल्या आहेत. जाणून घेऊया जगातील सर्वात महागडी लस कोणती आहे? ती महागडी लस कोणत्या आजारावर उपयुक्त ठरते? आणि या लसीच्या एका डोस किंमत किती आहे?

ट्विनरिक्स (Twinrix)

हेपटायटिस-ए आणि हेपटायटिस-बी या आजारांपासून बचाव करण्यासाठी ट्विनरिक्स ही लस रूग्णाला दिली जाते. या लसीच्या एका डोसची किंमत ६ हजार ९६१ रूपये इतकी आहे. या लसीचे अनेक ब्रॅण्ड उपलब्ध असून या लसीला जगभरात वेगवेगळ्या औषध कंपन्या त्यांच्या नावाने तयार करतात.

प्रेवनार 13 (Prevnar 13)

प्रेवनार ही लस लहान मुलांच्या आजारावर उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. लहान मुलांना होणाऱ्या डिप्थीरियासह अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी ही लस फायदेशीर ठरते. या लसीच्या ०.५ मिलीलीटर एका डोसची किंमत १० हजारांहून अधिक आहे.

मेनाक्ट्रा (Menactra)

मेनाक्ट्रा ही लस मेनिंगोकोकल मेनिनजायटिस आणि मेनिंगोकोकल सेप्सिस या आजारावर उपयुक्त ठरते. या लसीचे उत्पादन फ्रान्सची सैनोफी कंपनी मेनाक्ट्रा या नवाने करते. या लसीच्या एका डोसची किंमत ८ हजार ३८३ रूपये आहे.

गार्डासिल (Gardasil)

गार्डासिल ही अशी एकमेव लस आहे जी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papillomavirus HPV) पासून लोकांना वाचवू शकते. HPV हे सेक्स दरम्यान होणारं सामान्य संक्रमण आहे. हे संक्रमण पुरूष आणि महिला या दोघांमध्ये आढळून येते. या संक्रमणापासून बचाव कऱण्यासाठी गार्डासिल ही लस दिली जाते. त्याच्या एका डोसची किंमत १० हजार ५५५ रूपये इतकी आहे.

वॅरीसेला (Varicella)

वॅरीसेला या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी वॅरीसेला या लसीचा वापर केला जातो. सोप्या भाषेत या व्हायरसला चिकन पॉक्स असेही म्हटले जाते. चिकन पॉक्स झाल्यानंतर शरीरावर लाल रंगाचे चट्टे पडतात आणि शरीरावर झालेल्या या चट्ट्यांवर खाज सुटते. वॅरीसेला या व्हायरसची लागण लहान मुलांसह वयोवृद्धांना अधिक जीवघेणी ठरते. या लसीच्या एका डोसची किंमत ११ हजार ७५२ रूपये आहे.

प्रोक्वाड (Proquad)

प्रोक्वाड ही लस १२ वर्षांपर्यंत असणाऱ्या मुलांना दिली जाते. ही लस मीजल्स आणि रूबेला सारख्या आजारांपासून वाचवते. मीजल्स आणि रूबेलाची लागण झाल्यानंतर साधारण या लसीचा एक डोस पुरेसा ठरतो मात्र कधीतरी या लसीचा दुसऱ्यांदा डोस द्यावा लागतो. या लसीच्या एका डोसची किंमत साधारण ११ हजार ८२७ रूपये इतकी आहे.

जोस्टावैक्स (Zostavax)

ही लस वयवर्ष ५० किंवा त्याहून अधिक असणाऱ्या लोकांना शिंगल्स (Shingles) नावाच्या आजारापासून वाचवते. या आजाराला हर्पिस जोस्टर (Herpes Zoster) असेही म्हटले जाते. हा आजार वॅरीसेला व्हायरसपासून होतो, ज्यामुळे चिकन पॉक्सदेखील होतो. या आजाराचे लक्षणं देखील एक सारखेच असतात. या लसीच्या एका डोसची किंमत १३ हजारांहून अधिक आहे.

First Published on: December 18, 2020 11:10 AM
Exit mobile version