दोन मिनिटात ओळखा खाण्याचे तेल शुद्ध की बनावट?

दोन मिनिटात ओळखा खाण्याचे तेल शुद्ध की बनावट?

आपण रोजच स्वयंपाक घरात खाद्यपदार्थ किंवा स्वयंपाक बनवण्यासाठी खाद्य तेल वापरत असतो. मात्र हे तेल आपल्या आरोग्यासाठी किंती फायदेशीर हे कसे ओळखायचे तुम्हाला माहित आहे का? स्वयंपाकामध्ये वापरले जाणारे तेल भेसळयुक्त असेल तर ते आपल्या आरोग्याला मोठे नुकसानदायक ठरू शकते. भेसळयुक्त तेलाचे नियमित सेवन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कमी करू शकते. तेलाची गुणवत्ता खराब करण्यासाठी, नफा घेणारे मेटनिल यलो सारखा रंग किंवा ट्राय-ऑर्थो-क्रेसिल-फॉस्फेट सारखे रासायनिक घटक वापरतात, जे आरोग्यास प्राणघातक ठरत आहेत.

FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने अलीकडेच आपल्या ट्विटर हँडलवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये, तेलाची गुणवत्ता तपासण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती केवळ दोन मिनिटांत तेलाची गुणवत्ता ओळखू शकतो. जाणून घ्या हा सोपा मार्ग

अशी ओळखा तेलाची गुणवत्ता….

जर स्वयंपाकाच्या तेलात मेटनिल यलोसरखा कोणताही रंग वापरला गेला असेल तर तुम्ही ते सहज शोधू शकता. FSSAI ने सांगितल्या नुसार टेस्ट ट्युबमध्ये 1 मिली तेल घाला त्यानंतर त्यात कॉन्सेंट्रेटीड हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स करा. प्रक्रियेनंतर शुद्ध तेलाच्या वरच्या थराचा रंग अजिबात बदलणार नाही. तर भेसळयुक्त तेलाच्या वरच्या थराचा रंग बदलेल. असा प्रकारे तुम्ही तुमच्याकडील शुद्ध तेलाची गुणवत्ता तपासू शकाल.

First Published on: September 26, 2021 4:26 PM
Exit mobile version