अरे बापरे! कंत्राटदाराची संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे विस्फारले!!

अरे बापरे! कंत्राटदाराची संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे विस्फारले!!

प्रातिनिधिक छायाचित्र

तामिळनाडूमध्ये एका कंत्राटदाराकडून तब्बल १६० कोटी रूपयांची रोकड आणि १०० किलो सोने जप्त करण्यात आले आहे. विश्वास नाही ना बसत? आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती ही घबाड लागले आहे. प्रवासी बॅग, पार्क केलेल्या गाड्यांमध्ये रोख रोकड सापडली. तर सोन्याची बिस्कीटे देखील मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. याबाबत जाब विचारला असता कंत्राटदाराला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. चेन्नईतील एसपीके कंपनीवर धाड टाकत आयकर विभागाने चौकशी केली. त्यानंचतर हा सारा खजिना अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे. चेन्नईतील एसपीके कंपनीवरच्या धाडीमध्ये जप्त करण्यात आलेली संपत्ती ही देशातील सर्वात मोठी कारवाई ठरण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आणखी एखादा दिवस चौकशीसाठी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक अफरातफरीचा संशय आल्यानंतर संबंधित कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली. त्यानंतर हे सारे घबाड हाती लागले. दरम्यान, संबंधित कंत्राटदाराचे राजकीय कनेक्शन असल्याची माहिती देखीला यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी २०१६ साली नोटाबंदी लागू केल्यानंतर तब्बल ११० कोटींची रोकड चेन्नईतून जप्त करण्यात आली होती.

काळा पैसा

धाडीमध्ये सापडलेली संपत्ती ही बेहिशेबी संपत्ती असण्याची शक्यता आहे. कारण या संपूर्ण संपत्तीबद्दल आयकर अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला जाब विचारला. पण, त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर या अधिकाऱ्याला देता आले नाही. त्यामुळे कंत्राटदाराकडे सापडलेली संपत्ती ही बेहिशीबी ठरू शकते. दरम्यान, यानंतर कंत्राटदारावर काय कारवाई होते याकडे आता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: July 17, 2018 11:20 AM
Exit mobile version