गँगमनच्या सुरक्षेसाठी रेल्वेरुळावर कोंबड्याचा बळी

गँगमनच्या सुरक्षेसाठी रेल्वेरुळावर कोंबड्याचा बळी

अंधश्रद्धा ही मनात इतकी रुजली आहे की, कायदे करा किंवा शिक्षेची भिती दाखवा ती काही जात नाही. अधिक जोखमीच्या कामात असलेल्या व्यक्तींकडून तर अंधश्रद्धा सातत्याने जोपसली जाते. मग जिवाच्या सुरक्षेसाठी लिंबू ठेवले जाते, कोंबडे कापले जाते. रेल्वेचे गँगमन हे सातत्याने धोक्यात काम करतात. आजूबाजूने जाणार्‍या लोकल ट्रेन म्हणजे साक्षात यमदूतच. त्यांना चुकवत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे गँगमन काम करत असतात. रेल्वेच्या धडकीने अनेक गँगमनचा मृत्यूही झालेला आहे.

असे अपघात होऊ नयेत, गँगमनच्या जीवाला धोका उद्भवू नये म्हणून दरवर्षी गँगमनकडून रेल्वे रुळावर कोंबड्याचा बळी दिला जातो. रविवारी दुपारी पाऊणे बारावाजता गँगमनकडून दादर रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेच्या ट्रॅक नंबर पाचवर रेल्वे रुळाची पूजा करून तेथे कोंबड्यांचा बळी देण्यात आला. गँगमन दरवर्षी अशी पूजा करत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना कोणी रोखतही नाही. अर्थात ही अंधश्रद्धा असली तरी गँगमनची त्यावर श्रध्दा आहे. असा पूजाविधी केला की गँगमनच्या सुरक्षेची काळजी वाहिली जाते, या श्रद्धेवर गँगमन ठाम आहेत.

First Published on: July 16, 2018 6:43 PM
Exit mobile version