सरकार पूरवणार मुंबईकरांना सॅनिटायझर व मास्क

सरकार पूरवणार मुंबईकरांना सॅनिटायझर व मास्क

प्रातिनिधीक फोटो

करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाकडून देशातील सर्वाधिक गर्दीचं शहरं असणाऱ्या मुंबईतील जनतेला सॅनिटायझर आणि मास्क पुरवण्यात येणार आहेत. मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. करोनाची दहशत जगभरात मोठ्या प्रमाणात पसरली असून त्या भितीपोटी नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावल्याशिवाय कोणीही बाहेर पडत नाही. परंतु अलीकडे मेडीकल स्टोअर्समध्येही मास्कचा तुटवडा पडलेला आहे. एन-९५ मास्कची मागणी सामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, हे मास्क फक्त डॉक्टर आणि स्टाफ यांनी वापरायचे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.


हेही वाचाअमेरिकेनेच वुहानमध्ये करोना पसरवला- चीनचा गंभीर आरोप


अस्लम शेख म्हणाले, करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सॅनिटायझर आणि मास्क पुरवण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. यामध्ये रेल्वे स्थानक, मॉल इतर सार्वजनिक ठिकाणांचा समावेश असेल. मात्र, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क पुरवण्याबाबत अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. लवकरच याबाबत माहिती देण्यात येईल. मास्कपेक्षा लोकांना स्वच्छतेसाठी सॅनिटायझरची जास्त गरज असल्याने सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात येईल असेही शेख यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – करोनाशी दोन हात करायला, डॉक्टर कस्तुरबात सज्ज!


 

First Published on: March 13, 2020 4:40 PM
Exit mobile version