FB न वापरता देखील फेसबुकची तुमच्यावर नजर

FB न वापरता देखील फेसबुकची तुमच्यावर नजर

तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले अपलोड

आपण फेसबुक सोडून इतर कोणतेही App वापरत असताना देखील फेसबुक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर नजर ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण एखाद्या App च्या माध्यमातून शॉपिंग करत असताना, आपण कोणती माहिती शोधत आहोत, कोणत्या संकेत स्थळांना भेट देत आहोत या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती फेसबुकला मिळत असते. आपण कोणते उत्पादना जास्त सर्च करत आहोत, त्या संदर्भात काही काळानंतर उत्पादनाच्याशी निघडीत जाहिराती फेसबुकवर आपल्याला दिसत असतात.

ऑफलाइन असताना देखील फेसबुककडे तुमची माहिती

आपण ऑफलाइन असताना देखील आपली माहिती फेसबुककडे असते. सध्या फेसबुक ‘Off facebook activity’ राबवत आहे. काहीच दिवसांपूर्वी फेसबुकने हिस्ट्री डिलीटचा पर्याय दिला आहे. या वेळेस इतर कंपन्या फेसबुकसोबत आपला डेटा शेअर करतात. ज्या कंपन्यांशी आपण व्यवहार, शॉपिंग करताना जोडलेलो असतो किंवा ज्या वेबसाइटला आपण फेसबुकने लॉगइन करतो अशा वेबसाइटकडून फेसबुकवर आपल्याला आवडणाऱ्या किंवा आपण सर्च करत असलेल्या वस्तू आणि उत्पादनाच्या जाहिराती आपल्याला दिसतात.

इतर कंपन्या अशी शेअर करतात माहिती

आपण एखाद्या ऑनलाइन स्टोर वरून उत्पादन खरेदी करत असतो, त्यावेळेस ती कंपनी फेसबुकला त्यांच्या बिझनेस टूलच्या माध्यमातून याची माहिती शेअर करते. नंतर याची माहिती मिळताच ती आपल्या अकाऊंटला जतन केली जाते. आपण इ-कॉमर्सच्या वेबसाइटला भेट दिली आणि तेथून काय खरेदी केले ही माहिती येथे जतन होते.

कोणती माहिती शेअर करतात कंपन्या

First Published on: February 7, 2020 8:29 PM
Exit mobile version