माथाडी संपामुळे कल्याणमध्ये आवक वाढली

माथाडी संपामुळे कल्याणमध्ये आवक वाढली

कल्याण एपीएमसी मार्केट

माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे वाशी एपीएमसी मार्केटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. दररोज १५० गाड्यांची आवक होत असताना काल ३०० गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई, पालघरच्या व्यापार्‍यांची गर्दी झाली आहे.

मंगळवारपासून माथाडी कामगारांनी संप पुकारल्याने वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला उतरला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपला माल वाशीऐवजी कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये आणला आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये दररोज भाजीपाल्याची १५० गाड्यांची आवक होते. मात्र काल ३०० गाड्या दाखल झाल्या होत्या. प्रचंड आवक झाल्याने भाजीपाल्याचे दरही कोसळले आहेत. वाशी किंवा मुंबईत भाजीपाला जात नसल्याने ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यातूनही कल्याणला किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे कल्याण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे.

First Published on: November 29, 2018 5:30 AM
Exit mobile version