पबजी मोबाईल क्लब ओपन २०१९ मध्ये भारताची ‘टीम सोल’ फाईनला

पबजी मोबाईल क्लब ओपन २०१९ मध्ये भारताची ‘टीम सोल’ फाईनला

पीएमसीओ २०१९ विजयी टीम

मोबाईल गेममुळे अनेक वाईट कृत्य घडताना आपल्या समोर येत असतात. सध्या असाच एक मोबाईल गेम तो म्हणजे ‘पबजी’. हा गेम जगभरात धुमाकूळ घालत आहे. युवापिढीत पबजी गेमचे वेड मोठ्या प्रमाणात दिसून येते. हा गेम फक्त मुलंच खेळत नसून मुली देखील खेळत आहेत. नाण्याच्या जशा दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात तसेच पबजी गेमबाबत घडताना दिसत आहे. ब्लू व्हेल गेमनंतर आता पबजी गेममुळे आत्महत्या करण्याचे आणि गेम खेळता खेळता प्राण गेल्याचे प्रकारही घडले आहेत. पबजी गेम खेळता खेळताच प्रेमसंबंध जुळले आहे. तसेच हा गेम खेळून काहीजण कमवत देखील आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना पबजी गेममुळे घडल्या आहेत. आता ‘पीएमसीओ ग्लोबल फाईनल २०१९’ मध्ये ‘टीम सोल’ ही टीम भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

‘पीएमसीओ २०१९’ म्हणजे पबजी मोबाईल क्लब ओपन ही एक स्पर्धा आहे. पबजी खेळणाऱ्यांसाठी ही स्पर्धा ‘टेन्सन्ट गेम’ यांच्याद्वारे भारतात आयोजित केली होती. ‘टीम सोल’ ही टीम ‘पीएमसीओ ग्लोबल फाईनल २०१९’च्या स्पर्धेत बर्लिन येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

१४ आणि १५ जूनला नवी दिल्लीतील ‘त्यागराज स्पोर्ट्स कॉप्लेस’ येथे पीएमसीओ २०१९ फायनल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण १६ टीम सहभागी झाल्या होत्या. त्यामधून तीन टीम विजयी झाल्या. पहिल्या क्रमांकावर ‘टीम सोल’, दुसऱ्या क्रमांकावर ‘टीम आयएन डी’ आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘टीम इंडिया टायगर’ या टीम विजयी झाल्या. पहिल्या क्रमांकाच्या टीमला ६० हजार टॉलरचा धनादेश देण्यात आला. या स्पर्धेतील प्रत्येक टीमला धनादेश देण्यात आला. बक्षिसाचा खर्च १ लाख ७५ हजार डॉलर इतका करण्यात आला. ‘टीम सोल’मध्ये एकूण चार सदस्य सहभागी होते. मोर्टल, वायपर, रोनक, ओवेस हे चौघेजण ‘टीम सोल’मध्ये होते. येणाऱ्या ‘पीएमसीओ ग्लोबल फाईनल २०१९’ मध्ये हे चौघेजण भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

‘टीम सोल’ने साध्य केले की, मोबाईल गेममुळे फक्त वाईट कृत्य घडते असे नाही. मोबाईल गेम खेळणे हा वैयक्तिक निर्णय आहे. आता त्या गेमचा कोणता आणि कशाप्रकारे वापर करता येईल? हे देखील समजणं तितकंच महत्त्वाचं आहे.

First Published on: June 17, 2019 9:35 PM
Exit mobile version