आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचा पालिकेमध्ये गोंधळ

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचा पालिकेमध्ये गोंधळ

आमदार गणपत गायकवाड

आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या क्षेत्रातील ५ विकासकामांच्या संचिका पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे चिडलेल्या गणपत गायकवाड समर्थकांनी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात गोंधळ घालत जाब विचारला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दोन पॅनल १४ आणि १५ तसेच पॅनल क्रमांक १६ हा अर्धा कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येतो. या पॅनेल मधील ५ विकासकामांसाठी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून ८५ लाखांची विकासकामे हाती घेण्यात आली होती.

यासाठी मागणी पत्र गणपत गायकवाड यांनी प्रशासनाला दिले होते. त्या कामाचे प्राकलन तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतर मोठा कालावधी झाल्यानंतर ही निविदा प्रक्रिया का झाली नाही? हे पाहण्यासाठी गणपत गायकवाड यांचे काम पाहणारे उदय गायकवाड पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आले असता संचिका गहाळ झाल्याचे त्यांना समजले.

ही बाब पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना समजताच त्यांनी तात्काळ अभियंता महेश सितलानी याना जाब विचारला. ह्या संचिकांच्या छायांकित प्रति जिल्हाधिकारी कार्यालयातून आणून त्याच्या आधारे निविदा काढण्याचे ठरल्यावर गायकवाड समर्थकांनी पालिका मुख्यालयातून काढता पाय घेतला.

First Published on: August 9, 2019 10:48 PM
Exit mobile version