ए मामू लोग, ये हँसने के लिये जोक होना जरुरी है क्या?

ए मामू लोग, ये हँसने के लिये जोक होना जरुरी है क्या?

अभिनेता संजय दत्त याच्या मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटाच्या एका सीनवर सध्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

सोशल मीडिया आहे आणि त्यावर जोक्स, मीम्स होत नाहीत असं होणं शक्यच नाही. हल्ली दररोज कोणत्यातरी विषयावर मीम्स व्हायरल होत असतात. असेच काही मीम्स सध्या संजय दत्तच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातल्या एका सीनवर व्हायरल होत आहेत. ‘कॅज्युल्टी में कोई मरने की हालत में होगा, तो उसे फॉर्म भरना जरूरी है क्या?’ असा प्रश्न मुन्नाभाई या चित्रपटात बोमण इराणीला विचारतो. याच डायलॉगवर सध्या ट्रेण्ड होत असलेल्या विविध विषयांवर मीम्स व्हायरल होत आहेत.

एकाने भारतातल्या राजकारणावर बोट ठेवलं आहे…

व्हायरल मीम

तर दुसऱ्याने करण जोहरच्या चित्रपटांना टार्गेट केलं आहे…

व्हायरल मीम

कुठे येता-जाता इन्स्टाग्रामवर पोस्टी टाकणाऱ्यांची टर उडवलीये…

व्हायरल मीम

तर कुठे डीपीवर कॉमेंट करून मुलींना इम्प्रेस करणाऱ्यांना टोला लावलाय…

व्हायरल मीम

दुकानदार उरलेले सुट्टे पैसे देतच नाहीत अशी तक्रार एकानं केली आहे…

व्हायरल मीम

तर कुणी विद्यार्थी आणि पालकांच्या इंजिनिअरिंग प्रेमावर बोट ठेवलं आहे…

व्हायरल मीम

एकाने तर थेट वरूण धवनच्या अॅक्टिंगवरच मीम केलंय…

व्हायरल मीम

एकीकडे संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत असतानाच दुसरीकडे संजय दत्तच्याच सिनेमातल्या एका सीनवर मीम्स व्हायरल होत आहेत. नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला ऊत आलाय! आणि त्यांच्या निशाण्यावर अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींपासून थेट पॉलिटिकल नेत्यांपर्यंत सर्वच जण आहेत. आता मीम्स बनले, म्हणून या गोष्टी घडायच्या थांबणार नाहीत हे जरी खरं असलं, तरी सध्या या मीम्सने नेटिझन्सचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आहात, तर जरा जपूनच! कारण सोशल मीडियावर कुणीही आणि काहीही लपून राहात नाही!

First Published on: July 4, 2018 4:11 PM
Exit mobile version