हातात झाडू घेऊन आत्मक्लेश आंदोलन

हातात झाडू घेऊन आत्मक्लेश आंदोलन

Gandhi jayanti marinedrive photo arun patil

शासकीय कर्मचार्‍यांच्या नवी पेन्शन योजना विरूद्ध जुन्या पेन्शन हक्क संघटनेने मंगळवारी, 2 ऑक्टोबर रोजी आत्मक्लेश आंदोलन केले. आझाद मैदानात झाडू मारत 10 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी सरकारची नवी पेन्शन योजनाही ‘कचर्‍याच्या डब्यात’ घालत असल्याचे सांगितले. सरकारने सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही, तर लवकरच योजनेसह सरकारला कचर्‍यात जमा करू, अशी प्रतिक्रिया संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली.

मृत्युपश्चात शासकीय कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून भाजप सरकारने शासकीय कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नव्या पेन्शन योजनेला शासकीय कर्मचार्‍यांचा विरोध असून सरकारचा निषेध करण्यासाठी गांधीजींनी सुचवलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण झाली नाही, तर भविष्यात क्रांतीचा प्रखर मार्गही अवलंबवा लागेल, असा इशाराही वितेश खांडेकर त्यांनी दिला.

 

First Published on: October 3, 2018 2:23 AM
Exit mobile version