‘स्त्री’ येत आहे घाबरवायला

‘स्त्री’ येत आहे घाबरवायला

आली स्त्री घाबरवायला (सौजन्य- राजकुमार राव इन्टाग्राम)

हॉरर मुव्हीच्या चाहत्यांना घाबरवयाला लवकरच ‘स्त्री’ येणार आहे. बॉलीवूडच्या हॉरर पटाने तुमची आतापर्यंत निराशा केली असेल तर हा सिनेमा तुमची निराशा करणार नाही, हे मात्र नक्की! स्त्रीचा फर्स्ट लूक आल्यानंतर या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली होती. सिनेमात राजकुमार राव असल्यामुळे ही उत्सुकता साहजिकच होती. तुमची उत्सुकता वाढवणारा असाच हा स्त्रीचा ट्रेलरदेखील आहे.

ओ स्त्री कल आना

सिनेमाची कथा एका चेटकीणीची असून ती एका पुरुषाच्या शोधात आहे असं कळत आहे. ट्रेलरची सुरुवात या स्त्रीच्या कथेने होत आहे. आणि त्यात सतत ‘ओ स्त्री कल आना’ असे म्हटले आहे. स्त्री कोणत्यातरी कारणासाठी पुरुष जातीच्या मागेच लागली आहे. त्याचे कारण काय? यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. पण त्या आधी हा ट्रेलर पाहिल्यानंतर राजकुमार रावचा अभिनय तुमचे मन जिंकून घेतो. त्याचा सहज अभिनय तुम्हाला घाबरवायला भाग पाडतो. तर यात श्रद्धा कपूर राजकुमारची प्रेयसी असून तीच ही चेटकीण आहे का? असा प्रश्न पडतो.

 वाचा- स्त्री’चा पहिला लुक

राजकुमारचा तो सिनेमा आठवला का?

राजकुमारने आता अनेक वेगवेगळ्या सिनेमांमधून वेगळ्या भूमिका साकाल्या असल्या तरी त्याने या आधीही हॉररपटात काम केले आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरुवातच हॉररपटातून केली आहे. रागिनी एम एम एस हा त्याचा पहिला सिनेमा. त्यानंतर आता हा नवा सिनेमा नेमकी काय जादू करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

३१ ऑगस्टला होणार रिलीज

सिनेमाच्या ट्रेलरने तुमची उत्सुकता वाढवली असेल तर हा सिनेमा येत्या ३१ ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाचा दुसरा ट्रेलर येणार का ? किंवा काय नवा उलगडा होणार याची उत्सुकता आहे.

First Published on: July 27, 2018 5:29 PM
Exit mobile version