पंढरपूर नाही तर घरातच होणार विठूरायाचं दर्शन

विठ्ठलाला विष्णु आणि कृष्णाचा अवतार मानले जाते. वारकरी पंथाचं विठ्ठल हे आराध्य दैवत. याच विठु माऊलीपुढे नतमस्तक होण्यासाठी पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिनी वारकऱ्यांची वारी हजारोच्या संख्येने पंढरपूरला येते. पण यावर्षी मात्र कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे ही वारी रद्द करण्यात आली आहे. पण यामुळे विठूभक्त हिरमुसले नसून घरातच टाळमृदुगांच्या गजरात ते सावळ्या विठोबाची तेवढ्याच भक्तीभावाने पूजा करणार आहेत.

First Published on: July 1, 2020 8:00 AM
Exit mobile version