रिक्षा चालकांचा मुलगा झाला ‘आयएएस’

युपीएससी म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. पण नाशिकमधील रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांच्या मुलाने स्वप्नील पवार याने अवघ्या 23 व्या वर्षी आयएएस होण्याचे स्वप्न साकार केलं. युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया 635 वा रँक मिळवत यशस्वी झाला. विशेष म्हणजे कोणताही कोचिंग क्लास त्याने जॉईन केला नाही. पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातून केमीकल इंजिनिअरींगची पदवी मिळवल्यानंतर त्याने नोकरी सुरु केली. फॅब्स इंटरनॅशनल या कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून काम करतानाच युपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला. 2019 मध्ये युपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत त्याने आपल्या आई-वडीलांचे स्वप्न साकार केलं. आयएएस होण्यापेक्षा इंडियन फॉरेस्ट सर्विसेस (आयएफएस) भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे ध्येय त्याने निश्चित केलय. वेळ पडली तर त्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी स्वप्नीलने ठेवली आहे. आपण युपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कशासाठी करतो हे परीक्षार्थींनी अगोदर निश्चित केलं पाहिजे. त्याशिवाय यश मिळत नाही. फक्त अभ्यास करायचा म्हणून करण्याला काहीच अर्थ नसतो. त्याचे योग्य नियोजन करुन ध्येय निश्चित केले पाहिजे. तरच तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश मिळत. मराठी मेडीयम किंवा घरातील परिस्थिती या सर्व गोष्टींचा न्यूनगंड बाळण्याचे काहीच कारण नाही. आपले ध्येय निश्चित असेल तर मार्ग आपोआप सापडतात, असा दृढ विश्वास स्वप्नीलने व्यक्त केला.

First Published on: August 5, 2020 2:31 PM
Exit mobile version