गोदावरी पात्रातील काँक्रिटीकरण काढण्यास प्रारंभ

पंचवटीतील गोदापात्रामध्ये २००२ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २००१ मध्ये काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यामुळे गोदावरीतील १७ प्राचीन कुंड बुजले गेल्याने नदीपात्रातील जीवंत झरे नाहीसे झाले. तसेच काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील प्रदूषणही वाढले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने या कामास सोमवारी प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुती ते गाडगे महाराज पुलापर्यंत गोदावरीतील काँक्रिटीकरण काढून पाच कुंड मोकळे केले जाणार आहेत.

First Published on: June 8, 2020 8:46 PM
Exit mobile version