राज्यपाल कोश्यारी आणि सीएम ठाकरेंमध्ये रंगले लेटर वॉर

राज्यात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध राज्यपाल असा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले. यातच राज्यपालांनी महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करणारं आणखी एक लेटर मुख्यमंत्र्यांना लिहिलं. मात्र या लेटरमधील मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे राज्यात ठाकरेविरुद्ध कोश्यारी असा वाद चांगलाच तापला आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारींमधील लेटर वॉर मिळून राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी विरुद्ध उद्धव ठाकरेंचे लेटर वॉर नेमके काय आहे. हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

First Published on: September 23, 2021 1:19 PM
Exit mobile version