महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा १३०० पार

मुंबईतील काही दाटीवाटीच्या लोकवस्तीतील लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा १३४६ असून, त्यात ५० टक्यांपेक्षा अधिक म्हणजे ७४६ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईमधील रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. लवकरच यासाठी रणनीती आखणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

First Published on: April 9, 2020 10:08 PM
Exit mobile version