ठाण्यात परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांनी घेतली लस

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत आज पहिल्याच दिवशी १९५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला. गेल्या अनेक दिवंसापासू लसीचा तुटवडा असल्याने विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशनानुसार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची नियोजन केले. त्यानुसार सोमवार पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

First Published on: May 31, 2021 9:07 PM
Exit mobile version