यूजीसीने जाहीर केल्या देशातील 24 फेक युनिव्हर्सिटी

मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते. ही विद्यापीठे विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करतात. विद्यार्थी व पालकांची होणारी लूट थांबण्यासाठी देशातील मान्यता नसलेल्या म्हणजेच फेक विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) जाहीर करण्यात आली आहे. मान्यता नसलेल्या देशामध्ये तब्बल २४ विद्यापीठांची नावे यूजीसीकडून जाहीर करण्यात आली आहेत.देशातील २४ बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही यूजीसीकडून करण्यात आले.

First Published on: October 10, 2020 2:31 PM
Exit mobile version