टीकटॉकवरून गोंधळ पसरवणारे तिघे अटकेत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला एनआरसीशी जोडून लोकांमध्ये असंतोष निर्माण करणारा, गोंधळ पसरवणारा संदेश देणाऱ्या तिघांच्या मुसक्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगावमध्ये आवळल्या आहेत. हातात कोणताही सुगावा नसताना तीन जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी ही कारवाई केली. यासोबतच नाकाला नोटा चोळून आक्षेपार्ह संदेश देणारा व्हिडिओ टीकटॉकवर टाकणाऱ्या एका व्यक्तीला देखील मालेगावमधूनच पोलिसांनी अटक केली आहे.

First Published on: April 3, 2020 11:00 AM
Exit mobile version