रुग्णाच्या नातेवाईकांसह मनसेचा दावा

ठाण्यात वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांसह मनसेने केला आहे. तसेच खासगी रुग्णालयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे ही पाचंगे यांनी सांगितले आहे.

First Published on: April 26, 2021 3:42 PM
Exit mobile version