अवघ्या ४ वर्षाच्या मुलाचा खेळता खेळता मृत्यू

मुंब्रा परिसरातील सलमान पॅलेस इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून ४ वर्षाचा मुलगा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद जिशान अंसारी असे या मुलाचे नाव आहे. मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. अधिक तपास सुरु आहे.

First Published on: March 30, 2020 5:44 PM
Exit mobile version