वेतनवाढीसाठी शिक्षकांचा संप, शाळा विद्यार्थ्यांच्या जीवावर!

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी तीन दिवस राज्यभर आंदोलन सुरू आहे. यामध्ये राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झालेत. खेड तालुक्यातील सर्व शिक्षक हे खेड पंचायत समितीला ठिय्या मांडून बसले आहेत. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनीच शिक्षक बनून सहकारी विद्यार्थींना शिकवण्याची जबाबदारी उचलली आहे. शाळेचे सर्व दैनंदीन कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच सुरळीत ठेवले आहेत.

First Published on: August 9, 2018 11:46 AM
Exit mobile version