महाराष्ट्राचे लाडके भाऊजी पंढरीच्या वारीत

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आज ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी दिंडीत सहभागी झाले. फलटन जवळ निबोरे गावात माऊलींची पालखी आली असता आदेश बांदेकरांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतलं. तसेच दिंडीतील वारकर्यांसोबत टाळ वाजवत माऊली…माऊलींचा गजर करत वारीत सहभागी झाले. आदेश बांदेकर यांच्या सहभागाने वारकर्यांमध्येही उत्साह संचारला आणि त्यांनी भाऊजींसोबत ताल धरला.
First Published on: July 4, 2019 5:25 PM
Exit mobile version