माझ्या राजीनाम्याची अफवा पसरवली गेली- अब्दुल सत्तार

मातोश्री निवासस्थान हे माझ्या आईसारखं आहे. तिथे गेल्यावर आपली नाराजी दूर होत असते, असे सांगत राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्या राजीनाम्याच्या अफवा उठवल्या गेल्या. ज्यांनी अफवा पसरवली त्यांची नावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहेत. त्यावर तेच आता कारवाई करतील. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतरच आता मी पदभार स्वीकारणार, असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

First Published on: January 6, 2020 6:41 PM
Exit mobile version