पोलिसांकडून सहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी

विवियाना मॉल राडाप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोर्टात दाखल करण्यात आले होते. त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आव्हाड यांचे वकील विशाल भानुशाली यांनी माध्यमांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य केले. चौकशीला हजर राहिल्यावर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी सुटकेची मागणी केली आहे.

First Published on: November 12, 2022 4:32 PM
Exit mobile version