जाहिरात किती करावी?, प्रमाणपत्रावरुन अजित पवार भडकले

कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. त्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता ते भडकले. “सध्या देशात कोरोनाची महामारी सुरु आहे. अशा परिस्थितीतून नागरिकांना कसे बाहेर काढता येईल? तसेच लोकांना कसं सुरक्षित ठेवता येईल, याचा आम्ही विचार करतो. पेट्रोल भरायला गेलात तरी तिथे फोटो असतो. किती जाहिरात करावी”, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 14, 2021 8:30 PM
Exit mobile version