देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये कलगीतुरा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ठराव, अब्दुल सत्तार राजीनामा, एकनाथ शिंदे एनआयटी घोटाळा प्रकरण आदी विषयांवर अधिवेशन वादळी ठरत आहे. तसेच, आपआपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत आमदारांकडून लक्षवेधी मांडली जात आहे. असं असतानाही सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आहेत. यावरून आक्रमक होत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किलीत उत्तर दिलं आहे.

First Published on: December 27, 2022 1:37 PM
Exit mobile version