महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 12 जणांचा मृत्यू, मविआ नेत्यांची टीका

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरीत करण्यात आला यावेळी 20 लाखाहून अधिक श्री सदस्य सोहळ्याला हजर होते, मात्र उष्माघातामुळे 12 सदस्यांना जीव गमवावा लागला यासह अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार रुग्णांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले

First Published on: April 17, 2023 1:15 PM
Exit mobile version