अजित पवारांनी स्वत: कबूल केलं, काय म्हणाले पाहा ?

राष्ट्रवादीचे आमदार धनजंय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून, डॉक्टारांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. यासंदर्भात भाष्य करताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ”सगळ्यांनाच दम देऊन आपल्याला कानफाट्या नाव पडलंय,’ असं मिश्कीलपणे वक्तव्यही केलंय. तसेच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक आहेत. मी काकांना जाणता राजा म्हणा असे कुठं म्हटलो आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

First Published on: January 4, 2023 8:33 PM
Exit mobile version