अक्षय वाघमारेनी सांगितला बिग बॉसच्या घरातील प्रवास

बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोन मध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

First Published on: October 12, 2021 11:50 AM
Exit mobile version