वसमत विधानसभेसाठी रुग्णवाहिका भेट

वसमत विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांच्या वतीने रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना हेमंत पाटील म्हणाले की ‘शिवसेनेच्या बोधवाक्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी तळा गळामध्ये जाऊन गोर गरीब लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. कुणी अन्नदान कुणी लिटरचे टॅंक असा पुरवठा ज्या गोरगरीब लोकांना लागत आहे, अशांना पुरविण्याचे काम करीत आहेत’.

First Published on: June 3, 2021 11:06 AM
Exit mobile version