सरकारने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्या – अमित ठाकरे

मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या करत सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील ही घटना असून या वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. या घटनेनंतर मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनविसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये.

First Published on: June 7, 2023 9:48 PM
Exit mobile version