वर्धापन दिन दिमाखदार पद्धतीने होईल साजरा

“गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा १९ जून रोजी ५५ वा वर्धापन दिन असून तो यावर्षीही मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. कारण शिवसेनेचा वर्धापन दिन आम्हा शिवसैनिकांसाठी उत्सव आणि सण असतो. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरचा हा दुसरा वर्धापन दिन असून मुख्यमंत्री आपल्या भावना व्यक्त करतील आणि मार्गदर्शनही करतील”, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

First Published on: June 18, 2021 2:26 PM
Exit mobile version