अनिल परबांच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाई

ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्र्याच्या म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे. त्यावर मंगळवारी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल परब यांच्यावर सूडापोटी कारवाई केली जातेय का? तसेच पक्ष बदलण्यासाठी अनिल परब यांच्यावर दबाव आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. यावर अनिल परबांची प्रतिक्रिया काय आहे, ते जाणून घेऊयात

First Published on: January 31, 2023 2:58 PM
Exit mobile version