निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष होत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी दर्शवली आहे. निकालाची प्रत हाती न आल्यामुळे यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे, अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

First Published on: September 9, 2021 5:34 PM
Exit mobile version