आंबेडकरी तरुणांना अटक करणे निषेधार्ह – आ. प्रकाश गजभिये

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर अनेक कार्यकर्त्यांना अटक केले गेले होते. विनाकारण आंबेडकरी तरुणांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्यानंतर आम्ही विधीमंडळात आवाज उचलला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले. पोलिसांनी मुंबईत आंबेडकरी तरुणांचे कोबिंग ऑपरेशनबाबत आपलं महानगरचे प्रतिनिधी प्रवीण पुरो यांनी गजभिये यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

या घटनेमध्ये जे नाहक गोवले गेले आहेत त्यांची सुटका करावी, अशी मागणी सभागृहात केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १३ मार्च २०१८ रोजी आश्वासन दिले की, कोणत्याही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणार नाही किंवा त्यांना अटक करणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश पोलिसांनी पाळलेले नाहीत. काल आम्ही या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन दिली. मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोरच डिजींना फोन करुन विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तरिही जर धरपकड सुरु राहिली तर आम्ही पुन्हा सभागृहात आवाच उचलू असे गजभिये यांनी सांगितले.

First Published on: July 12, 2018 6:27 PM
Exit mobile version