आसाराम बापूची जन्मठेप राजस्थान, हरयाणा, मप्र राज्यातील निवडणुकांवर परिणाम करेल?

आसाराम बापू बलात्कारी असल्याचे शिक्कामोर्तब आज न्यायालयाने केले. या निकालामुळे आसारामच्या भक्तांना मात्र प्रचंड मानसिक आघात झाला आहे. हा आघात राजकीय दृष्टीने भाजप पक्षालाही बसणार असे दिसत आहे. भाजपने आसाराम बापूच्या आध्यत्मिक गुरुची पाठराखण केली होती. या निकालामुळे राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरयाणा सारख्या राज्यातील आगामी निवडणूकीत हिंदुत्ववादी मतावर मोठा परिणाम होऊ शकतो. राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरयाणात भाजपची सत्ता आहे. चार वर्षांपूर्वी आसाराम बापूला अटक झाली तेव्हा भाजपचे नेते गळे काढत होते की काँग्रेस हिंदुत्ववादी संताना बदनाम करत आहे. मात्र भाजपची सत्ता असणाऱ्या राजस्थान कोर्टानेच त्यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो. एकीकडे आसाराम बापूच्या भक्तांची नाराजी हिंदुत्ववादी संघटनांच्या मतावर होईल. या नाराजीला भाजप कशी फूंकर घालेल, हे पाहणं गरजेचे आहे.

First Published on: April 26, 2018 10:03 AM
Exit mobile version