मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल – रुक्मिणी महापूजा

आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल – रखुमाईची महापूजा आज पहाटे ३.४० च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. तसेच यंदाचा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला. कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जगाला मुक्त करं, असं साकडं विठुरायासमोर मुख्यमंत्र्यांनी घातलं.

First Published on: July 1, 2020 9:28 AM
Exit mobile version