आशिष शेलारांचे मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीवरून इशारा

भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तयार केलेली डॉक्युमेंटरी TISSमध्ये दाखवण्यात येणार आहे. या डॉक्युमेंटरीवर भारतात बंदी आणली आहे. तरी ती दाखवण्यात येत असल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलारांनी मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. तुम्ही कारवाई करावी अन्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ, असे आशिष शेलार म्हणाले.

First Published on: January 28, 2023 3:37 PM
Exit mobile version