अमोल काळे शेलार-पवार पॅनलचे नवे उमेदवार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला काहीच दिवस बाकी आहेत. ही निवडणूक येत्या २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आता एकत्रितपणे संयुक्त पॅनल घेत मैदानात उतरले आहेत. परंतु एमसीएच्या अध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

First Published on: October 14, 2022 6:05 PM
Exit mobile version