बच्चू कडू रुग्णालयात दाखल

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास अमरावती येथे बच्चू कडू यांचा अपघात झाला. सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचीही माहिती आहे. कार्यकर्त्यांना माहिती होताच कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी झाली आहे.

First Published on: January 11, 2023 11:31 AM
Exit mobile version