आम्ही शिवसेनेवर नाराज नाही, काँग्रेस महाविकासआघाडीत

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे संविधान विरोधी आहे. देशाची घटना कोणताही धर्मभेद करत नाही. महा विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम हा संविधानाला अनुसरुन आहे. त्यामुळे शिवसेना त्याप्रमाणेच भूमिका घेईल, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र तरिही आम्ही महा विकास आघाडीतच आहोत, शिवसेनेसोबत आमची नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

First Published on: December 11, 2019 1:51 PM
Exit mobile version