कोविड उपचारांसाठी दिलासा

कोविड १९ आजारावरील उपचारांसाठी आता बँकांकडून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. इंडियन बँकिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजकिरण राय यांनी यासंदर्भातील योजनेची घोषणा केली आहे. या कर्जावरील व्याजदर स्टेट बँकेने ८.५ टक्के जाहीर केले आहे. बँकेचे खातेदार आणि त्यांच्या कुटुंबियांवरील कोविड उपचारांसाठी हे कर्ज घेता येईल.

First Published on: May 31, 2021 4:56 PM
Exit mobile version