आरोपांविरोधात तुरूंगात जाण्याचीही माझी तयारी

देशात सात वर्षे ही काळ्या राजवटीला झाली आहेत, माझा आरोप आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करा. पंतप्रधानांविरोधात बोलल्यासाठी तुरूंगात जाण्याचीही माझी तयारी आहे. खर बोलण हा गुन्हा असेल, तर आम्ही कॉंग्रेसवाल्यांनी त्या काळात ब्रिटिशांविरोधात लढा उभारला होता, आता हाच लढा लोकशाहीने निवडून दिलेल्या सरकाराबाबत आहे. भाजपने काय करावे हे आम्ही सांगत नाही. भाजपच्या नेत्यांना आमच्या हक्काच्या लसीबाबत आम्ही जे प्रश्न विचारले विचारले, त्यात चुकीचे काय हे सांगावे. भाजपला सगळे आकडे मॅन्युपुलेट करता येतील. पण लस निर्यात केल्याची आकडेवारी कशी मॅन्युप्युलेट करता येईल. माझ्या दीड कोटी मुंबईकरांना लसीपासून वंचित ठेवत असाल, आणि लसीबाबत विचारणे हा आमचा गुन्हा वाटत असेल, तर मला अटक करा. मुंबई आणि महाराष्ट्राला जी वागणुक दिली त्याबद्दल आम्ही बोलणारच.

First Published on: May 30, 2021 12:07 PM
Exit mobile version