FDAचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली, भाजपची नाराजी

राज्यात रेमडेसिवीरवरुन राजकारण चांगलेच तापले आहे या पार्श्वभूमीवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. या बदली विरोधात भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. ‘अधिकारी अभिमन्यू काळेंची बदली म्हणजे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली तसाच हा प्रकार आहे. स्वतःची पापं आणि अपयश लपवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या माथ्यावर मारायचं. आपण स्वच्छ आणि अधिकाऱ्यांकडूनच सर्व चुका झाल्या अशी भूमिका या सरकारची गेल्या वर्षभरापासून सुरु आहे’, असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

First Published on: April 21, 2021 4:30 PM
Exit mobile version