मुंबईत बीकेसीमध्ये १००० खाटांचे कोविड – १९ हॉस्पिटल होणार

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात १००० खाटांचे कोविड १९ हाँस्पिटल उभारण्यात येत आहे. ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार असे हे हॉस्पिटल पुढील १५ दिवसात युद्धपातळीवर उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नगरविकस मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष टिम तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही केली आहे. याच युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची पहाणी करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली आणि एमएमआरडीए संयुक्तपणे या हॉस्पिटलची निर्मिती करत आहेत. 
First Published on: May 3, 2020 11:02 AM
Exit mobile version