कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेने केलेल्या मास टेस्टिंग मोहिमे अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या १५० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर डिलिव्हरी बॉय, ब्यूटी पार्लर, सलून इत्यादी कर्मचार्‍यांचादेखील या सुपर स्प्रेडर्समध्ये समावेश करण्यात आला असून आता यांची देखील कोरोनाची चाचणी केली जात आहे.

First Published on: December 3, 2020 10:20 AM
Exit mobile version