व्हीलास्टेला इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

बोरीवलीत शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीचा सज्जा कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे. बोरीवली पश्चिम येथील आय.सी.कॉलनीतल्या व्हीला स्टेला या इमारतीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत शिवसैनिकांसोबत मदतकार्य सुरू केले.

First Published on: June 14, 2020 11:06 AM
Exit mobile version